सूर्यकुमार व्यंकटेश अय्यरची धडाकेबाज खेळी, वेस्ट इंडिजचा ३-० ने व्हाईटवॉश

कोलकाता: सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी२० सामन्यात १७  धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र विंडिजला निर्धारित २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १६७ धावा करता आल्या.


ईडन गार्डांवरच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी सामन्याची सुरवात केली, पण जेसन होल्डरच्या गोलंदाजीसमोर ऋतुराज टिकला नाही. त्याला होल्डरने ४ धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर किशन, श्रेयस आणि रोहितलाही मोठी खेळी करता आली नाही.तत्पूर्वी सूर्यकुमार आणि व्यंकटेश अय्यरच्या पाचव्या विकेटच्या भागीदारीच्या बळावर भारत ५ बाद १८४ धावपर्यंत पोहचला होता. निर्धारित लक्षाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ दीपक चहरच्या गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकला नाही. हर्षल पटेल (३-२२) आणि शार्दुल ठाकूर (२-३३) यांनी दबावाखाली खेळून वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावांवर रोखले आणि दौऱ्यात त्यांना विजय मिळवून दिला.

रोहितचा नवीन विक्रम
भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी-२० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. त्यानंतर विराट कोहली ( १६) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांचा विक्रम येतो.घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( १५), न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( १५) व ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( १४) हे आघाडीवर आहेत.

Share