सय्यद मोदी इंटरनॅशनल: महिला एकेरीत पी व्ही सिंधू विजयी

 लखनौ- भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने महिला  एकेरीत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. तिने अंतिम फेरीत भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसेडचा पराभव करत या स्पर्धेच जेतेपद पटकावलं.

 

रविवारी लखनौ येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सिंधूने सलग सामन्यात मालविकाचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला. अव्वल स्थानी असलेल्या सिंधूचे हे दुसरं सय्यद मोदी स्पर्धेचं विजेतेपद आहे. यापूर्वी तिने २०१७ मध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं.

Share