ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं -केतकर

मुंबई : देशातील पाच राज्यांचा निकाल हाती लागल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल चर्चांना उधाण आलं आहे.  गेल्या काहीदिवसापासून भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पाच राज्यांच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईलं असा दावा केला होता. याच दरम्यान राज्यातील ठाकरे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते असं विधान काॅंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केले आहे.

काल पाच राज्यांतील निवडणूकांच्या निकालानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना कुमार केतकर म्हणाले की, महाराष्ट्राचे सरकार कोणत्याही क्षणी जायला तयार आहे. त्यांनी मिशन कमळ काढलं तर जातील.’ तसेच महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून मी हेच सांगतोय. तीन पक्षांचा सरकार आहे. ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरत नाहीत. ते प्रमाणिक लोक आहेत त्यांच्या घरी छापे टाकत नाहीत. उदाहर्णार्थ नारायण राणे आहेत. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल. म्हणजे आपण आत्ता बोलतोय ना तिकडे सरकारला सुरुंग लावण्याची तयारी सुरु झालेली असेल, असेही कुमार केतकर म्हणाले.

Share