शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारचा जवळपास दीड महिन्यांनी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली.यादरम्यान मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने तसेच खातेवाटपावरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करुन नाराजी दूर करण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. अशातच १५ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, नाराज होतो म्हणुन आलो नाही, मी थोडं कामानिमित्त बाहेर होतो, त्यामुळे येऊ शकलो नाही. नाराज आहे म्हणून न येण्याचं काही कारण नाही. जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा होईल तेव्हा बच्चू कडू मंत्री राहिल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मला वाटतं मी मागे पण सांगितलं होतं की, मी व्यक्तीगत हितासाठी नाराज होणार नाही.आमचे काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर आमची लढाई चालू राहिल. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसंबंधी बोलताना ते म्हणाले ईडीचा उपयोग देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी केला आणि तो सार्वत्रिक केला तर चांगलं होईल. मोहित कंबोज यांच्या ट्वीटसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी हे उचित नाही असं स्पष्ट मत मांडलं. कोणातरी राजकीय नेत्यांना बोलावं, त्यानंतर कारवाई करावी हे योग्य नाही असं ते म्हणाले.

Share