चारधामांपैकी एक असलेल्या गंगोत्रीचे दरवाजे ३ मे रोजी उघडणार.

३ मे रोजी उत्तराखंडमधील चारधामपैकी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे कपाट भाविकांसाठी खुले होतील. गंगोत्री येथे गंगा नदीचे मंदिर आहे. असे मानले जाते की राजा भगीरथने गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आणली. त्यामुळे गंगोत्रीमध्ये गंगेसोबतच राजा भगीरथची पूजाही केली जाते.

गंगा नदी गोमुखातून उगम पावते आणि गंगोत्रीपासून पुढे निघून अनेक राज्यांमधून आणि शहरांमधून बंगालमध्ये गंगासागराच्या काठी समुद्राला मिळते. मुखबा गावातील सेमवाल ब्राह्मण हे मंदिराचे पुजारी आहेत. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३०४२ मीटर उंचीवर आहे. गंगोत्री प्रदेशात गंगेला भागीरथी म्हणतात.

गंगेचे मुख्य उगमस्थळ आहे गोमुख
गंगोत्रीपासून १९ किमी पुढे गोमुख हिमनदी आहे. गंगा नदीचे हे मुख्य उगमस्थळ आहे. हे ठिकाण अतिशय दुर्गम असून इथे सहज पोहोचता येत नाही. राजा भगीरथने गंगोत्री पर्वत परिसरात खडकावर बसून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, असे मानले जाते. भगीरथाच्या तपाने प्रसन्न होऊन शिव प्रकट झाले आणि त्यांनी केसात गंगेचा वेग धारण करण्याचे वरदान दिले. यानंतरच गंगा पृथ्वीवर अवतरली.

Share