‘हीरोपंती २’ सिनेमातील पहिल गाण प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः  अभिनेता टायगर श्रॉफयाने २०१४ मध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील रोमान्स, दमदार अॅक्शन आणि क्रितीसोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता लवकरच टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सिनेमातील पहिले गाणं ‘दफा कर’ रिलीज झाले आहे. सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

https://www.instagram.com/tv/CbjrV2PJARa/?utm_source=ig_web_copy_link

‘दफा कर’ गाण्यात टायगर श्रॉफ सिंहासनावर बसलेला दिसत आहे. तारा सुतारियानेदेखील तिच्या हटके अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. टायगर श्रॉफच्या चाहत्यांमध्ये सध्या या गाण्याची क्रेझ आहे. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाची केमिस्ट्री या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती २’ सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘हीरोपंती २’ ईदच्या मुहूर्तावर २९ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच पहिल गाण पहिलेच गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याचे प्रचंड कौतुक होत आहे. ‘हीरोपंती 2’ सिनेमातील हे गाणं ए आर रहमान आणि हिरल विराडिया यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल मेहबूब कोतवाल यांनी लिहिले आहेत.

तारासोबत जमणार जोडी!
या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जिने यापूर्वी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटात त्याच्यासोबत काम केले आहे. या दोघांव्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे, तर चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे.

Share