‘बधाई दो’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः  बधाई दो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते. पण आता हा सिनेमा ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणीवर चित्रपट भाष्य करणार आहे.

 

बधाई दो’ या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज झाले आहे. ‘अटक गया’ असे या गाण्याचे नाव आहे. हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. हे गाणं वरुण ग्रोवरने लिहिले असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केले आहे. तर अरिजीत सिंह आणि रुपाली मोघेने हे गाणं गायले आहे. चित्रपटात राजकुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून भूमी पेडणेकर पीटी शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सीमा पाहवा, शीबा चढ्ढा आणि लवलीन मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हर्षवर्धन कुलकर्णीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्राच्या ‘बधाई हो’ सिनेमाचा ‘बधाई दो’ हा सिक्वेल असणार आहे.

Share