बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे, देशमुखांचा गैप्यस्फोट !

मुंबई – राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब माझ्याकडे द्यायचे असा गैप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. अनिल परब यांनी दिलेली यादी आपण अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे देशमुख यांनी जबाबात म्हटले आहे. या धक्कादायक खुलास्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे का ?

पोलिसांच्या बदल्यांच्या यादी प्रकरणी विचारला असता , त्यावेळी त्यांनी आपल्याला कोणत्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती तर अनिल परब यांनी ही यादी दिल्याचा खुलासा देशमुख यांनी केला आहे.तसेच या यादीमध्ये जी काही नावे आहेत त्यांची त्यांना हव्या त्या ठिकाणी बदली करावी असे सांगण्यात आले होते. या यादीची कुठेही नोंद नसून आलेली ही यादी आपण एसीएस खात्याला पाठविली होती. अनिल परब ही यादी कुठून आणायचे याबाबत विचारले असता, देशमुख यांनी सांगितले की, शिवसेनेमध्ये असलेले एमएलए किंवा एमएलसी त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची यादी त्यांना द्यायचे आणि त्यानंतर ही यादी मला पाठवायचे असे देखील देशमुख यांनी म्हटले आहे.पुढील तपासात काय समोर येणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.

Share