बहिणीला सतत मारतो म्हणून साल्यानेच केली भाऊजीची हत्या, औरंगाबादेतील ‘त्या’ खुनाचा लागला तपास

औरंगाबाद : शहरात काल एकाच दिवशी तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यापैकी हिमायतबाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला आहे. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणुन आरोपीने मृतदेह जाळला होता. त्यामुळे या खुनाचा तपास करणे आणि मृतदेहाची ओळख पटविणे याचे आव्हान पोलीसांसमोर होते. पण पोलीसांनी वेगाने तपासचक्र फिरवत एका दिवसातच या हत्येचा शोध लावला आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. बहिणाला सतत मारहाण करणाऱ्या भाऊजीची साल्याकडून हत्या करण्यात आल्याच पोलीस तपासात समोर आले आहे. सुधाकर नारायण चिपटे (वय.४३, रा.सांगले कॉलनीअसे मृताचे नाव असूनराजेश संतोष मोळवडे असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर चिपटे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करायचात्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी दारू पिऊन पत्नीशी वाद घालून तिला मारहाण करायचादरम्यान सहा महिन्यापूर्वी राजेश मोळवडे बहिणीच्या शेजारीच भाड्याच्या घरात राहण्यासाठी आला होतायावेळी बहिणीला भाऊजीकडून सतत होणारी मारहाण पाहून त्याला प्रचंड राग यायचात्यामुळे त्याने भाऊजीचा गेम करण्याचं ठरवलंत्यानुसार शनिवारी रात्री घरी कोणी नसल्याची संधी पाहून राजेशने सुधाकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केलेज्यात सुधाकरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राजेशने सुधाकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शक्कल लढवलीआधी सुधाकरचा मृतदेह पांढऱ्या गोणीत टाकलात्यांनतर गोणीवर आणखी एक पोत चढवत मृतदेह मोपेडवरून घेऊन हिमायबागमध्ये पोहचलामृतदेहाची ओळख पटू नये म्हणून पेटवून दिलापण मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या एका फार्म हाउसवरील कामगार हा लघुशंकेसाठी उठला असतात्यांना आग लागल्याचे दिसलेत्यांनतर हा सर्व प्रकार समोर आला.

सीसीटीव्हीत कैद झाला आरोपी…

मृतदेह जाळल्यानंतर याची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होत. पोलीसांनी शोध सुरु केला आणि लच्छु पहेलवान यांच्या फार्महाऊसवरील सीसीटीव्हींची तपासणी केली. यात एक युवक स्कुटीवर गोणी घेऊन जात असल्याचे दिसले. मात्र यात गाडीचा अर्धाच भाग दिसत होता. पोलीसांनी आणखी शोध घेत यामधील आरोपीची ओळख पटविली. आरोपी स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

 

Share