पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल- नाना पटोले

मुंबई :  देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. देशात अनेकांच लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा यश मिळालं. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळवता आला आहे. पाच राज्यांमधील दारूण पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे.

सध्या राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकरा लवकरच पडणार असल्याचं बोललं जात आहे. शिवाय ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. असं असताना आता काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान या आधी नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी देखील स्थानिक निवडणुकात काॅंग्रसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता.

Share