मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए कोर्टाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. यापुर्वी नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र आजच्या सुनावणीदरम्यान ईडीन नवाब मलिक यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, चौकशीसाठी त्यांच्या कोठडीचा कालावधी वाढवून मागितला. विशेष न्यायलयाने ही मागणी मान्य करत नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु, नवाब मलिक यांच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर संध्याकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik sent to judicial custody by Special PMLA court in Mumbai.
He was arrested by ED on Feb 23rd, in connection with Dawood Ibrahim money laundering case.
(File photo) pic.twitter.com/k2haFkEdPW
— ANI (@ANI) March 7, 2022
मलिकांवर नेमके आरोप काय?
नवाब मलिकांनी दाऊदशी संबंधित माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर २३ फेब्रुवारीच्या सकाळीच मलिकांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने मलिकांनी अटक केली.