प्रतीक्षा संपली! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजणार

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी ३:३० वाजता पत्रकार परिषद होणार असून त्यातच पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यात उत्तरप्रदेश,पंजाब,उत्तराखंड,मणिपुर,गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट?

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट असताना निवडणूक जाहीर करत असताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होणार का हे पाहावं लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना होणारी गर्दी, प्रचारसभा या संदर्भात निवडणूक आयोग कठोर नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. कोरोना लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केल जाण्याची शक्यता आहे

Share