मुंबई- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ईडी कार्यालयासमोर निदर्शने सुरु आहेत.यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे.