राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली : काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी इंदूरमध्ये येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. इंदौरमधल्या एका दुकानात हे पत्र आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात राहुल गांधी यांना धमकी देणारं पत्र ठेवण्यात आलं होतं. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. साधारण २४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदौरमध्ये जाणार आहेत. त्या आधी हे धमकीचं पत्र आलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आता सतर्क झाले असून हे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.गलेला नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येत आहे.

काय म्हटले आहे चिठ्ठीत…
राहुल गांधी यांना धमकी देण्यात आलेल्या या चिठ्ठीत म्हटले आहे की, भारत जोडो यात्रा इंदुरमध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्यात येईल. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. दोन दिवसांपूर्वी त्यानी सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून जोरदार राडा सुरू झाला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे. असं वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होतेय.

Share