मनसेकडून उद्या होणाऱ्या महाआरतीचा कार्यक्रम रद्द

मुंबई : मनसेकडून पुण्यात ३ मे रोजी महाआरती आणि हनुमान चालीसाचं पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण तो कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.  उद्या ईद आहे.आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. अस राज ठाकरे यांच्या कडून सांगण्यात आलं आहे.

 

उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन”, असा संदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ट्विटरवरुन दिला आहे.

Share