‘द कश्मीर फाईल्स‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबईः अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा आगामी चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स‘ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत.

‘द कश्मीर फाईल्स हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे.१९८९आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर हा सिनेमा भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

द कश्मीर फाईल्स हा चित्रपट येत्या ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट येत्या ११ मार्चला प्रदर्शित होतोय.

Share