दैनिक सामनाच्या संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे

मुंबई : दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे  यांच्याकडे सोपवण्यत आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्य संपादकपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सामनाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर शिवसेनेत हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. दरम्यान ते आता कोणत्याही संविधानीक पदावर नसल्याने पुन्हा सामनाच्या संपादक पदाची धुरा सांभाळणार आहेत.

Share