केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांना सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यांना दुपारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना एम्समधील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share