वाईन विक्री प्रकरणावरून शरद पवारांच मोठं विधान !

बारामती- राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्केट आणि ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे . मात्र शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांच्या जवळ वाइन विक्रीला परवानगी मिळणार नसल्याच देखील राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.  या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. एकीकडे राज्य सरकार निर्णयाच समर्थन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  याबाबत मोठं विधान केल आहे.

माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की , वाइन तसेच इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचं कारण नाही. हा चिंताजनक विषय आहे असं वाटत नाही. पण काहीजणांना वाटत असेल तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर त्याच्यात फारसे वाईट वाटण्याचे कारण नाही. असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

Share