‘राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते, त्याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे’

शिर्डी : आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाही आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीवर टीका होता आहे, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काॅंग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला आजपासून शिर्डी येथे सुरुवात झाली. या शिबिरात त्यांनी शिंदे- फडणवीस सरकार जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढाली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत व अस्वस्थ आहे याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवदेन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही, अशा शब्दात जयंत पाटील यानी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आव्हान जयंत पाटील यांनी केले.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येत असेही ते म्हणाले.

Share