संजय राऊतांना जामीन की कोठडी वाढणार? आज कोर्टात फैसला

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडी  कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करून तब्बल ९ तास झाडाझडती घेतली होती. संजय राऊतांच्या भांडूप येथील बंगल्यात ही धाड मारण्यात आली होती. त्याचवेळी राऊतांच्या दादरमधील गार्डन कोर्ट प्लॅटवरही छापा मारण्यात आला होता. तसेच गोरेगाव येथेही छापा मारण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तिथेही राऊत यांची  चौकशी करून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी त्यांची अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. राऊत यांची कोठडी आज संपत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय?

पत्रा चाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या ६७२ भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GAPCL) ने म्हाडासोबत २००७ साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण १४ वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला. पत्रा चाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

Share