मस्कत- मस्कत येथे सुरु असलेल्या आशिया चषक हाॅकी स्पर्धाेत भारताने दमदार सुरवात केली आहे. सलामीच्या या सामन्यात भारताने ९-० ने मलेशायाचा धुव्वा उडवला आहे.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथे स्थान पटकावण्याच्या कामगिरीनंतर प्रथमच मैदानात उतरणाऱ्या भारतीय महिला संघाने या सामन्यात आक्रमक शैलीत दाखवत सामना जिंकला आहे. भारताकडून वंदना कटारिया, नवनीत कौर, शर्मिला यांनी प्रत्येकी दोन, तर दीप ग्रेस , लालरेमसिआमी आणि मोनिका यांनी प्रत्येकी एक गोल केले आहेत.
गोलरक्षक सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. भारताचे चांगली कामगिरी सुरू राखण्याचे लक्ष्य असून रविवारी त्यांचा जपानविरुद्ध दुसरा साखळी सामना होणार आहे.