वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये नीरज चोप्रा.

बुडापेस्ट | भारताला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने डबल धमाका केला आहे. नीरजने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये ठसा उमटवला आहे. नीरजने आपल्या पहिल्याच थ्रोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बुडापेस्ट इथे वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप क्वालिफिकेशन राऊंड सुरु आहे. नीरजने या पात्रता फेरीत धमाका करत थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.  इतकंच नाही, नीरजने आगामी ऑलिम्पिकचंही तिकीट कन्फर्म केलं आहे. गोल्डन बॉय अशी ओळख असलेल्या नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा धमाका केला आहे.

पुढील ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये पॅरिस इथे होणार आहे. नीरजने फेकलेला पहिलाच भाला हा 88.77 मीटर इतका लांब गेला. आता नीरज वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर आहे.

दरम्यान नीरजने या थ्रो सह पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्यासाठी 85.50 मीटर लांब भाला फेकायचा होता. मात्र नीरजने फेकलेला भाला हा त्यापेक्षा लांब गेला. नीरजने 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीतही धडक मारली आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय केलं.

Share