संजय शिरसाट यांचे मोठे विधान

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या बाबत काही विधाने केल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीमधील घडामोडींमुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पडद्यामागचा गेम काय सुरू आहे, अशी चर्चा रंगली आहे. आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांची खेळी समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या सूचक विधानमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवार इतक्या लवकर त्यांचे पत्ते ओपन करतील हे समजण्याचं कारण नाही. शरद पवार यांची खेळी जेव्हा समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, असं संजय शिरसाट म्हणाले.

Share