योगी, महाराजांची जागा मठात, राजकारणात आले की…

सोलापूर : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यथ मिळालं. तर, पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर भाजप नेत्यांनी काॅॅग्रेसवर जोरदार टिका केली. यावर आता काॅँग्रेसचे नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. योगी, महाराज यांची जागा मठात आहेत. ते राजकारणात आले तर वाटोळे होते, अशी खरमरीत टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

सोलापुरातील काॅँग्रेसच्या एका मेळाळ्यात आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, पण जेव्हा योगी- महाराज राजकारणात येतात तेव्हा देशाचं वाटोळे सुरु होते. जे काम करतात त्यांना मतदान देणं महत्वाचं आहे. लोकशाही टिकवायची असेल तर कामाला महत्व द्या, असं देखील प्रणिती शिंदे म्हणाल्या.

निवडणुकीत वेळी शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द केले, वर्षभर आंदोलन केलं. ७०० शेतकऱ्यांचा बळी घेतला. युपीचं इलेक्शन आलं म्हणून कायदे रद्द केले. देशाला तोडण्याची ही लोकं भाषा करतात, असं त्यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान ही अनमोल देणगी दिली आहे. केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

Share