तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; राम कदमांच ठाकरे सरकाराला इशारा

मुंबई : राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते. यंदा उत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शन सुचना जारी केल्या आहेत. त्या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावेच लागणार आहे. या नियमावलीनुसार, रात्री १० वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाहीये. तसेच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळेच डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  याच मुद्द्यावरून  भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असं राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

 

होळी धुळवडीसाठी सरकारची नियमावली

रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक.
डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई.
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई.
महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी.
दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई.
कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये.

 

Share