नागपूरात भाजपचे शक्ती प्रदर्शन ; फडणवीसांचे जल्लोषात स्वागत

नागपूर-  गोवा विधानसभा निवडणूकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपला घवघऴीत यश मिळवून दिल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेच्या आशिर्वादानेच गोवा निवडणूकीत यश मिळाल आहे. 2024 मध्ये देखील जनतेच्या आशिर्वादानेच राज्यात भाजप सरकार बहुमताने येणार आहे. मोदीजींनी दिलेल्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न मी केला आहे.असं यावेळी फडणवीस म्हणाले. तसेच यावेळी ते म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे हे यश मिळालं. हा जनतेचा कौल आहे. राष्ट्रीय स्तरावर काम केलं की जबाबदारी बदलते. त्यावेळी सिद्धतेचं आव्हान असतं. नागपुरकांना केलेला हा सत्कार मी पंतप्रधान मोदी आणि गोव्याच्या जनतेकडून स्वीकारतो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तुमचं पुढचं मिशन काय ? या प्रश्नावर ते म्हणाले, आमचं मिशन भाजप देईल तेच, आमचं मिशन एकच जनतेचं कल्याण, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

 

 

Share