‘दाऊद जो गुंडा है…’अमोल मिटकरींची गाण्याव्दारे भाजपावर टीका

मुंबई-  1993 सालच्या बाँम्ब हल्याचा मुख्य आरोपी दाऊद याचा विषय सध्या राज्यात चर्चेत आहे. दाऊदच्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी नवाब मलिकांना अटक देखील करण्यात आली. आता भाजप त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली आहे.  भाजपाकडून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारंवार दाऊदचा उल्लेख करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहेत. गुन्हेगारांशी संबंध असलेल्या मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही, असा इशारा भाजपाने दिला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसिध्द श्रीवल्ली गाण्याव्दारे भाजपवर निशाणा साधला आहे.

यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सध्या प्रसिद्ध असलेल्या पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याचा आधार घेत भाजपावर टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ‘श्रीवल्ली’च्या चालीवर गाणं गात भाजपाला टोला लगावला आहे.

मिटकरी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, नज़रें मिलते ही नज़रों से ,  नज़रों को चुराये , कैसी ये हया तेरी , जो तू पलकों को झुकाये , दाऊद जो गुंडा है , उसको निहारे तू (भाजपावाल्यांनी दाऊदचे फोटो फिरवले) , और जो गरवीदा है उसको टाले तू , तेरी झलक बीजेपी ये कैसी, नैनोमेसे उतरी, तेरी झलक बीजेपी ये कैसी, बाते करे तू नकली , असं गाणत म्हणत त्यांनी भाजपवर टिका केली आहे.

 

 

 

Share