अभिनेता जॉन अब्राहम सह पत्नीला कोरोनाची लागण

मुंबईः राज्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. बॉलिवुड मधील कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे . सोशल मीडियावर याबाबद माहिती जॉन अब्राहमने दिली आहे.

जॉनने केलेली पोस्ट, तीन दिवसापूर्वी मी एका व्याक्तीच्या संपर्कात आलो होते, मला नंतर लक्षात आले की त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. माझी पत्नी प्रिया आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच क्वारंटाईन झालो आहोत. दोघांनीही लस घेतली आहे. आम्हाला सैम्य लक्षणं आहेत. तुम्ही सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्कचा वापर करा.

बॉलिवुड मधील करिना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

Share