पवार , पॉवर न राष्ट्रवादी !

राष्ट्रवादी काँग्रेस च्या फुटीनंतर चौथ्या दिवशीही कोणाकडे किती आमदार , याबाबत सस्पेन्स कायम आहे . या निगडित दोन्ही गटांकडून आज मुंबईमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे . शिंदे गटाकडून जसा बाळासाहेबांच्या फोटोचा वापर केला जातो तसा अजित दादा गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरण्यात येऊ नये असे दस्तुरखुद्द स्वतः पवार साहेबांनी बजावले आहे .

एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे कार्यकर्ते दोन गटात विभागले गेल्याने यांमधील परस्पर विरोध कशा पद्धतीने घडतो हे पाहणे रंजक ठरेल . सकाळी ११ वाजता अजित दादांच्या गटाची बैठक वांद्र्यात तर १ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांच्या गटाची बैठक पार पडणार आहे .

Share