मिनी लाॅकडाउन ? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

**मुंबई-** राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात मिनी लाॅकडाउन लागेल का ? यासाठी राज्यातील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. राज्यात आधीच निर्बंध लावले असताना रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक महत्वाची बैठक पार पडली. सकाळी ९ वाजता तातडीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव आणि इतर महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सकडून राज्यातील एकंदरीत स्थितीचा आढावा घेतला. हा आढावा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार असून त्यानतंर मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावायचे यासंबंधी निर्णय़ घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. आज रात्री यासंबंधी नियमावली जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share