खारीक खाण्याचे फायदे

फार पूर्वीपासून खारीकचे सेवन लोक करत आले आहेत. खारीक आपल्या आरोग्यासाठी निसर्गाचे अनमोल वरदान आहे. खारीक हे एक (dry fruit) गोड फळ आहे. विशिष्ट जातीचे खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खारीक हे ताकत तंदरुस्तीचे प्रतीक आहे. नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांच्या आहारामध्ये खारीक हमखास आढळते.

खारीक खाण्याचे फायदे,

त्वचेशी संबंधित: खारीक नियमित खाल्याने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात व त्वचा उजळ बनते, अशा प्रकारे वृद्धत्व दूर ठेवण्यास खारीक मदत करते.

डोळे: खारीक मध्ये जीवनसत्व “अ” मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे दृष्टीशी निगडीत सर्व विकार दूर होतात व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

कॅन्सर: कॅन्सर सारख्या भयंकर आजारांवर खारीक ही अतिशय लाभदायक आहे, शरीरातील वाढत्या कॅन्सरला आळा घालण्याचे काम खारीक करते.

दुर्बल शरीर: खारीक मध्ये विटामीन व प्रथिने यांचे प्रमाण असल्याने वजन वाढीस खारीक फायदेशीर आहे, शरीराने कमजोर असलेल्या लोकांसाठी खारीक एक वरदान आहे. शरीर मजबूत ठेवण्यास खारीक अतिशय उपयुक्त आहे. खारीक मध्ये कॅल्शियम व लोह मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. खारीक शरीरातील कमजोरी थकवा दूर करते.

पचनक्रिया: खारीक मध्ये फायबर असल्याने पचन संस्थेशी निगडीत सर्व समस्या दूर होतात. रात्री खारीक पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.

रक्त वाढ: शरीरातील रक्त वाढीसाठी खारीक अतिशय उपयुक्त आहे. खारीक खाल्ल्याने हृदय तंदुरुस्त व निरोगी राहते.

हाडे व दात: खारीक मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असल्याने दोन ते तीन खारीक (बीज बाहेर काढून) दुधामध्ये मिसळून नियमित पिल्याने शरीरातील हाडांची झीज होणे थांबते व दातांची कमजोरी दूर होते. लहान मुलांसाठी थोड्याश्या दुधामध्ये खारीक उकळवून पिण्यास दिल्यास मुलांचे दात, हाडे बळकट होण्यास मदत होते. आपण पाहतो लहान मुले नेहमी चॉकलेट, बिसकिट, यांसारख काही न काही नेहमी खात असतात, अशा खाण्याने दात किडणे, दात दुखणे, यांसारख्या समस्या उद्भवतात जर आपणास आपल्या मुलाच्या या समस्या पासून सुटका पाहिजे असेल तर चॉकलेट च्या ऐवजी रोज एक खारीक मुलाच्या हातात खायला द्यावी म्हणजे लवकरच त्याची चॉकलेट खाण्याची सवय दूर होईल आणि मुलांची गोड खाण्याची इच्छा सुद्धा खारीक मुळे पूर्ण होईल.

चश्मा लागणे: सतत मोबाइलच्या वापरामुळे, अभ्यासाच्या अधिक बोजामूळे, फार कमी वयात चश्मा लागणे ही समस्या जन्म घेऊ लागली आहे, यावर मात करण्यासाठी रोज खजूर खाल्यास चश्मा लागणे यांसारख्या समस्या पासून लवकरच मुक्तता मिळू शकते.

इतर शारीरिक फायदे: खारीक शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित ठेवते. खारीक मध्ये ग्लुकोजचे प्रमाण असल्याने खारीक शरीरामध्ये 1 एनेर्जी बूस्टर चे काम करते. खारीकच्या नियमित सेवनाने शरीरातील थकवा नाहीसा होण्यास मदत मिळते. अर्धांगवायू, सर्दी यांसारख्या आजारामध्ये सुद्धा खारीक फायदेशीर आहे.

Share