महावितरण आणणार इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी चार्जिंग स्टेशन

महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्टेशन्सला  उभारण्यात येणार आहेत. यासाठी सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यात येणार आहे. एक खिडकी स्वतंत्र वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कामाची दखल घेत, आत्मनिर्भर भारत परिषदेत महावितरणला ‘ट्रान्सपोर्ट अँड मोबिलिटी’ या कॅटेगरीत ‘इलेट्स इनोव्हेशन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.

राज्य शासनाने ई- वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून महावितरणकडून पहिल्या टप्प्यात ५० नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महावितरणाचे पुणे येथील पहिले ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महावितरणने इव्ही ग्राहकांसाठी ‘पॉवर ॲप’ तयार केले आहे. या ॲपमध्ये चार्जिंग स्टेशनचे लोकेशन, चार्जिंग चालू बंद करण्याचा पर्याय, पेमेंट करण्यासाठी  वॉलेट उपलब्ध करून दिले आहे. तसेच ॲपवरून चार्जिंग करता लागणारा वेळ, चार्जिंग करता वापरले जाणारे वीज युनिट व वॉलेटमध्ये उपलब्ध बॅलन्स यांचीही माहिती ग्राहकांना मिळणार आहे.

महावितरणने राज्यात ५० नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम सुरू केले आहे. यात पुण्यात १८ , नवी मुंबईत १०, ठाण्यात ६ ,नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती येथे प्रत्येकी २ आणि नागपूरात ६ चार्जिंग स्टेशन्सचा समावेश करण्यात आला आहे.

Share