मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं – चंद्रकांत पाटील

मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तवय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पनवेलमध्ये भाजप कार्यकरिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते.

चंद्रकात पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती, जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले ते देवेंद्र फडणवीस होय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दरम्यान, राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अस मानलं जातं होत मात्र भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर आता काही दिवस उलटत नाही तोच चंद्रकांत पाटील यांच्या या खळबळजनक विधानांनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते किंवा युतीवर काय परिणाम होतो हे सुद्धा पहायला हवं.

Share