Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. कोणत्या राज्यात किती जागांसाठी बहुमत लागते हे पुढील प्रमाणे
- पंजाब
पंजाब हे देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे गेली वर्षभर हे राज्य चर्चेत राहिले. पंजाब विधानसभेत एकूण ११७ जागा असून बहुमतासाठी अवघ्या ५९ जागांची आवश्यकता आहे. - उत्तराखंड
उत्तराखंडमध्येही बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. या राज्यात भाजप सत्ताधारी पक्ष आहे. पण भाजपला गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलावे लागले. त्यावरून पक्षातील अंतर्गत कलह आणि राज्यातील अस्थिरता दिसून येते. ७० जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी अवघ्या ३६ जागांची आवश्यकता आहे. - गोवा
गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे. पण या राज्याने नेहमीच देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. गोव्यातील निवडणूक पूर्वीचे आणि निवडणुकीनंतरच समीकरण नेहमीच वेगळे असते. त्रिशंकू विधानसभेत तर गोव्याची सर्वच समीकरणे बदलून जात असल्याचे पाहायला मिळते. गोवा विधानसभेत ४० जागा आहे आणि बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता आहे. - मणिपूर
मणिपूर विधानसभेत एकूण ६० जागा आहेत. पण बहुमतासाठी ३१ जागांची आवश्यकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एनपीएफ, एनपीपी आणि एलजीपीशी युती करून सरकार स्थापन केले होते. - उत्तरप्रदेश
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा आहेत. या राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान झाले. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ४०३ सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेशात मॅजिक फिगर गाठण्यासाठी कोणत्याही सरकार २०२ जागांची गरज आहे.
पंजाबमध्ये तर आम आदमी पार्टी बहुमताच्या पार गेल्याचे सुरुवातीच्या कलावरून दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाल्याचे दिसत आहे.उत्तर प्रदेश मध्ये भाजपनेही बहुमताचा आकडा गाठलेला असुन पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात बऱ्याच कालावधी नंतर मतदारांनी सत्ताधारी पक्षाला पुन्हा सत्तेची संधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेच्या जागांचं गणित वेगळे आहे.