मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी

मुंबई- आज राज्याचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांंनी भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी राज्याने 100 कोटींची तरतूद केली असल्याची घोषणा केली आहे.  महाराष्ट्र सरकारने लता दिनानाथ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना येथील प्रांगणात जागा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. अशी माहिती अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला होता. तर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमिपूजन होऊ शकले नाही. परंतु उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कलीना येथील तीन एकरचा भूखंड या महाविद्यलयासाठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच याचे भूमिपूजन होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते.

 

 

Share