यवतमाळ- राज्यातल्या गरजूंना अल्प दरात जेवणाची सोय करून देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या संदर्भातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका शिवभोजन थाळीच्या केंद्रातील भांडी शौचालायात धुतांनाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे.
किळसवाणा प्रकार! चक्क शौचालयात धुतल्या जात आहेत शिवभोजन थाळ्या#ShivBhojan #Yavatmal #ViralVideo #Maharashtra #ShivBhojanThali pic.twitter.com/ShHZFEDmcX
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 29, 2022
व्हिडीओमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव येथील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामधील त्रुटी समोर आल्या आहेत. महागाव तालुक्यामधील त्रिमुर्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून नवीन बस स्टॅण्डसमोर चालवण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रावरील भांडी शौचालयामध्ये धुतली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडवली जात आहे. आता या शिवभोजन थाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.