शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

विनायक मेटे हे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह बीडहून मुंबईकडे येत होते. मात्र खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. अखेर काही वेळानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अपघाताचं स्वरुप भीषण असल्याने मेटे यांना हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही.

कोण होते विनायक मेटे
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य

Share