राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत विश्वजीत संगीत विद्यालयास द्वितीय क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय समरगीत गायन स्पर्धेत विश्वजीत संगीत विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. विक्रोळी येथील कामगार कल्याण भवन येथे येथे ९ ऑगस्टला राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा पार पडली. राज्यभरातून १९ समरगीत संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.

या संघात सचिन शिंदे, गणेश श्यामल, नितीन गायकवाड, प्रथमेश शेवतेकर, उदय पाटील, सानिका कुलकर्णी, आरती ढाकणे, श्रावणी पदुमने, अर्चना कंकाळ, मानिका कापसे, अनुजा वाघ, अनुराधा पांचाळ, आदींचा समावेश होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसिद्ध लोकशाहीर नंदेश उमप यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंगेश चव्हाण, प्रतिभा वाघमारे यांनी काम पाहिले. तर रविराज इवले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विश्वजीत संगीत विद्यालयाचे उपाध्यक्ष किशनराव शिंदे, रमेश अवचार, सतीष वैद्य, डाॅ. गहिनीनाथ वळेकर या सर्वांनी अभिनंदन केले.

Share