अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला मावळमध्ये अपघात

पुणे- प्रसिध्द अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांच्या गाडीला अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली असून कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही. त्यांनी हि माहिती फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. तसेच या अपघाताचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. यात गाडीचं मोठ नुकसान झाल्याच दिसत आहे.

तसेच त्यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की, आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार सके ना कोई…” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हंटल आहे.

Share