अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण

covid Positive : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला, तरी त्याचा प्रभाव अधअयापही कायम आहे. यातून बॉलिवूड इंडस्ट्रीही सुटू शकली नाही. कोरोनाच्या दोन लाटांत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी स्वत:ला वाचवण्यात यश मिळवलं असताना, तिसऱ्या लाटेत प्रत्येकजण एकापाठोपाठ एक कोरोना विषाणूला बळी पडत आहेत. आता दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण झाली आहे. श्रुतीने सोशल मीडियावर याबाबद माहिती दिली आहे. “सर्वप्रकारे काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. पण आता प्रकृतीत सुधारणा होत आहे”. असे म्हणत तिने पोस्ट शेयर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

https://www.instagram.com/p/CaeBeEeNUFx/?utm_source=ig_web_copy_link

श्रुतीचे चाहते आणि कलाकारमंडळी तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. दाक्षिणात्य कलाविश्वासोबतच श्रुती हसनने हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. लॉकडाऊन दरम्यान श्रुतीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. लवकरच श्रुतीचा ‘सालार’ ‘Salaar’ नावाचा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे. तर अल्केमी एलएलपी, सिद्धार्थ पी मल्होत्रा, सपना मल्होत्रा ​​हे या सीरिजचे निर्माते आहेत.

Share