‘काश्मिर फाइल्स’नंतर आता ‘लंडन फाइल्स’ अर्जुन रामपाल दिसणार महत्वाच्या भुमिकेत

इंग्लंडमध्ये चित्रिकरण झालेल्या लंडन फाइल्स वूट सिलेक्टवर 21 एप्रिलपासून स्ट्रीम होईल.

लंडन फाइल्स’ ही नवीन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्जुन रामपाल आणि पूरब कोहली यांच्या भूमिका असलेल्या या वेब सिरिजचा चित्तवेधक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा ड्रामा आणि सस्पेन्स यांनी सज्ज असलेली ही सहा एपिसोड्सची सिरिज येत्या 21 एप्रिलपासून वूट सिलेक्टवर स्ट्रीम होणार आहे. ‘लंडन फाइल्स’ ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर सिरिज आहे.

https://www.instagram.com/tv/CcSPHBjAQAZ/?utm_source=ig_web_copy_link

डिटेक्टिव्ह ओम सिंगच्या भूमिकेत असलेल्या अर्जुन रामपालने लंडन शहरातील हरवलेल्या व्यक्तीची केस घेतल्यावर घडणाऱ्या घटना ही मालिका दाखवते. वैयक्तिक समस्यांचा सामना करत असलेल्या ओमला मीडियातील दिग्गज अमर रॉयच्या हरवलेल्या मुलीची केस घेणे भाग पडते. पूरब कोहलीने साकारलेला अमर हे अत्यंत क्रूर अँटी इमिग्रेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. ओम प्रकरणाची चौकशी सुरू करतो तसे एक अधिक गडद रहस्य प्रकाशात येते. त्यातून गाडली गेलेली सत्ये आणि ओमचा दाबला गेलेला इतिहास प्रकाशात येण्याची भीती निर्माण होते.
चित्तथरारक ड्रामा आणि सस्पेन्स यांनी सज्ज असलेल्या लंडन फाइल्समध्ये अर्जुन रामपाल आणि पूरब कोहलीसह गोपाल दत्त, सपना पब्बी, मेधा राणा, सागर आर्या आणि ईवा जेन विलिस यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल अर्जुन रामपाल म्हणाला, “लंडन फाइल्स ही सिरिज मी यापूर्वी केलेल्या इतर प्रकल्पांपेक्षा वेगळी आहे. खरे सांगायचे तर भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर मी अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प मी पाहिलेला नाही असे मला वाटते. ओम  एक हाय प्रोफाइल केसची चौकशी करतो त्या वेळी आज रोजच्या रोज दिसणाऱ्या अनेक समस्या त्यातून दिसतात. डिटेक्टिव्ह ओमची व्यक्तिरेखा अनपेक्षित, चुकांनी भरलेली आणि गुंतागुंतीची आहे आणि या व्यक्तिरेखेला साकारताना माझ्यावरही त्याचा प्रभाव पडला.”

पूरब कोहली सांगतो, “रॉक ऑननंतर अर्जुनसोबत सेटवर जाताना खूप मजा आली. अर्जुनने या मालिकेत खूप सुंदर काम केले आहे. अमर रॉयच्या अनेक गडद बाजू आहेत. तसेच मी मोहितसोबत आणि अजयसोबत दुसऱ्यांदा काम करतोय. माझ्या निर्मात्यांसोबतचे नाते घट्ट होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.”

Share