मुंबई : ‘मन उडू उडू झालं’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेला सुरुवातीपासून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेत अजिंक्य राऊत हा ‘इंद्रा’ ची तर हृता दुर्गुळे ही ‘दीपू’ ची भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील इंद्रा आणि दीपू यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. ही मालिका रंजक वळणावर आली असताना लवकरच या मालिकेतून इंद्राची भूमिका साकारणारा अजिंक्य राऊत गायब होणार असून, त्याची जागा दुसराच अभिनेता घेणार आहे. कारण, आता या मालिकेत इंद्राचे बालपण दाखविण्यात येणार आहे. त्यामुळेच मोठ्या इंद्राच्या जागी आता लहान इंद्राचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.
टीव्ही मालिकेत प्रेक्षकांनी गुंतून राहावे यासाठी मालिकेत काही ना काही नवे ट्रॅक आणि ट्विस्ट आणले जातात. उद्याच्या भागात काय दाखवणार ही उत्सुकता सतत प्रेक्षकांमध्ये असावी, असे मालिकेच्या निर्मात्यांना वाटत असते. त्यातूनच मालिकेतील कलाकारांना कधीतरी गायब करायचे, त्यांचे रूप बदलायचे किंवा नवीन कलाकाराची एंट्री करायची, असे नवनवीन फंडे वापरले जातात. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतदेखील नवनवे प्रयोग केले जात आहेत. नवे ट्रॅक आणि ट्विस्ट आणले जात आहेत.
https://www.instagram.com/p/CfLkq_RJis6/?utm_source=ig_web_copy_link
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत अजिंक्य राऊत हा इंद्रजित साळगावकर म्हणजेच इंद्रा तर हृता दुर्गुळे ही दीपिका देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे मनोहर देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे ही जोडी इंद्रा आणि दीपू या नावाने सध्या मालिका विश्वात खूपच गाजत आहे. हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही जोडी ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे इतकी लोकप्रिय झाली आहे की, या जोडीच्या सोशल मीडियावरील फोटोंना लाखो लाइक्स मिळत असतात. हृता आणि अजिंक्य सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याने त्यांना चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो.
सध्या या मालिकेत सध्या इंद्रा आणि दीपू यांच्या प्रेमाला घरातून कडाडून विरोध सुरू आहे. या मालिकेत इंद्रा आणि दीपू यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे त्यांच्या घरात कळते; पण इंद्रा हा बँकेत वसुलीचे काम करत असल्याने दीपूचे वडील आणि इंद्राचे शिक्षक त्यांच्या प्रेमाला कडाडून विरोध करत असल्याचा ट्रॅक सुरू आहे. इंद्राच्या आईलाही खरे तर दीपू आणि इंद्राचे नाते मान्य असते; परंतु इंद्राने तो वसुलीचे काम करत असल्याचे न सांगितल्याच्या रागातून त्याच्या आईने त्याच्याशी अबोला धरला आहे. मालिकेच्या या ट्रॅकमध्ये इंद्राने जे केले ते परिस्थितीमुळे आणि वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी केले, असे म्हणत इंद्राचा मित्र सत्तू त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो; पण तरीही इंद्रावर घर सोडण्याची वेळ आली आहे. सध्या इंद्रा सत्तूच्या घरी राहत असून, दीपूनेही बाबांच्या विरोधात जाऊन इंद्राला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
https://www.instagram.com/reel/CXX02R7Kwbo/?utm_source=ig_web_copy_link
ही मालिका सध्या रंजक वळणावर आली असताना अचानक इंद्राची भूमिका करणाऱ्या अजिंक्य राऊतच्या जागी दुसराच अभिनेता दाखवण्याची तयारी सुरू झाली आहे. याला कारणही खास आहे. इंद्राने त्याच्या घरासाठी अगदी शालेय वयापासून पडेल ते काम केले याचा साक्षीदार त्याचा मित्र सत्तू आहे. सत्तू आता दीपिका म्हणजे दीपू आणि देशपांडे सर यांना इंद्राच्या बालपणातील संघर्षाविषयी सांगताना पुढच्या काही भागात दिसणार आहे. त्यामुळेच ही मालिका आता प्रेक्षकांना इंद्राच्या बालपणात घेऊन जाणार आहे.
https://www.instagram.com/p/CarcXrGLvg5/?utm_source=ig_web_copy_link
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या पुढच्या काही एपिसोडमध्ये इंद्राचे बालपण, वडिलांच्या निधनानंतर त्याने घरासाठी केलेले कष्ट याची गोष्ट उलगडणार आहे. त्यामुळेच मोठ्या इंद्राच्या जागी लहान इंद्रा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. छोट्या इंद्राच्या भूमिकेसाठी नव्या कलाकाराची निवड झाली असून, अजून त्या बालकलाकाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. हा नवा ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागली आहे.