‘रिपाई’ आठवले गटाच्या देशभरातील सर्व कमिटी बरखास्त

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले (आठवले) या पक्षाच्या देशभरातील सर्व राज्यांच्या राज्य कमिटीचे अध्यक्ष आणि राज्य कमिटी तसेच सर्व जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कमिटी ही पदे बरखास्त करण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या देशभरातील राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी अधिकृतरित्या बरखास्त करण्यात आली असून लवकरच नवीन जिल्हाध्यक्ष, जिल्हा कमिटी तसेच देशभरातील राज्य कमिटी नव्याने पक्षांतर्गत निवडणूक घेऊन करण्यात येईल अशी अधिकृत घोषणा आठवले यांनी काल मुंबईतून केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झाली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी रामदास आठवले यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यानंतर आता देशभरातील सर्व राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी नव्याने निवडणूक घेऊन नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

Share