भोंग्यावरील गदारोळावर ठाकरे सरकारची आज सर्व पक्षीय बैठक

आज झालेल्या बैठकीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे चालू ठेवता येणार आहेत अस सांगण्यात आल फक्त आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. हा  कायदा सर्वांसाठी समान आहे असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

राष्ट्रीय पातळीवर जर हा निर्णय घेतला किंवा त्याला देशात लागू केला तर राज्या-राज्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती राहणार नाही. त्यामुळे आवश्यकता असलेल्या सर्व पक्षांनी शिष्टमंडळ घेऊन केंद्रातल्या प्रमुख नेत्यांना त्यांनी भेटावे, त्यानंतर त्यांनी देशपातळीवर ही भुमिका स्पष्ट करावी, अशी राज्य सरकारची भुमिका असल्याचे गृहमंत्री  म्हणाले.

त्याचबरोबर ते याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. सध्या आहेत त्या गाईडसलाईन्स पुराशा आहेत की, नाही किंवा त्यात काही आवश्यकता आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर पोलिस कारवाई करण्यात येईल.

केंद्राचे हे जे जज्मेंट पर्यावरणाच्या संदर्भातला आहे. नॉईस पोलिसांच्या संदर्भातला आहे. त्यामुळे हे सगळे जीआर पर्यावरण विभागाने काढले आहे. गृहखाते त्याची अमलबजावणी करण्याचे काम करतो आहे. असे पाटील म्हणाले. त्याच बरोबर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वाजवायला सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच खासदार इम्तियाज जलिल या बैठकीला मात्र गैरहजर होते.

Share