अमोल काळे लंडनला तर बाकीचे दुबईला पळाले : नवाब मलिक

मुंबईः शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवार अनेक आरोप केले आहे. त्यांनी अमोल काळे आणि आणखी काही लोक कुठे आहेत? ते पळून गेले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावर आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमेल काळे लंडनला पळून गेले आहेत तर बाकीचे दुबईला पळून गेले आहेत. त्यांना केंद्राच्या मदतीने माघारी आनण्यात यावे असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक महणाले की, अँटिलिया बॉम्ब प्रकरणी एक सदस्यी समिती स्थापन करण्यात आली आहे. चांदिवाल आयोगाने १५ तारखेला नोटीस पाठवली होती. वाझे यांनी माझ्यावर आरोप केला आहे की मी त्यांची बदनामी करत आहे. मी स्वतः आयोगासमोर जाणार आहे आणि माझी बाजू मांडणार आहे.

 

आज जात पडताळणीसाठीची देखील तारीख आहे. तिथे देखील मी माझी बाजू मांडणार आहे. केंद्रीय मागास वर्गीय आयोगाने समीर वानखेडे यांना क्लीन चिट दिली परंतु ज्यांनी दिली ते हल्दर आहेत. ते काही लोकांच्या घरी देखील जाऊन आले होते. हल्दर कोणताही अधिकार नसताना निर्णय देत आहेत. कोणाची जात सिद्ध करण्याचे अधिकार अरुण हल्दर यांना नाही. त्यामुळे मी राष्ट्रपतीकडे या संदर्भात मी तक्रार करणार आहे. मी त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीकडे पत्र लिहून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

Share