भाजपच्या दबावामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी  भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली याच्यावर हे लोक काही बोलत नाहीत. त्यावर भाजपच्या लोकांनी बोललं पाहिजे. भाजपच्या दबावामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. या किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दोन वेळा धमकी दिली, असा गंभीर आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की,  कोण आहे किरीट सोमय्या सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे, बंगले शोधणार आणि घरे शोधणार. तुम्ही त्याच्या मागे जाता. ही काय बातमी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तेथील जमिनीनवर एकही बांधकाम, बंगला नाही. यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपाच्या लोकांना बहुतेक भुताकटकीने झपाटलं आहे. त्या जागेंचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते.

अन्वय नाईकसारखा एक मराठी माणूस, उद्योजक यांनी भाजपाच्या दबावामुळे आत्महत्या केली, कारण हे लोक अर्णब गोस्वामीला वाचवत होते. किरीट सोमय्यांनीदेखील अन्वय नाईक यांना अर्णब आत्महत्या केली, कारण हे लोक अर्णब गोस्वामीला वाचवत होते. किरीट सोमय्यांनीदेखील अन्वय नाईक यांना अर्णब गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, बिल पाठवायचं नाही यासाठी धमकावल्याची माझ्याकडे माहिती आहे. दोन वेळा बोलावून त्यांना धमकावण्यात आलं. त्यानंतर ही आत्महत्या झाली आहे. भाजपाच्या लोकांनीच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली.

भाजपाचे लोक महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रत्यत्न करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व अन्वय नाईकचे हत्यारे असून आणि त्यांच्यातील एक हत्यारा त्या जमिनीवर चालला आहे,” असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बाप आणि बेटे जेलमध्ये जातील असा इशारा दिला. तसंच किरीट सोमय्या हे काही नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू असल्याचा उल्लेख केला.

Share