मुख्यमंत्र्यांनी सांगाव माझ्या पत्नीचे १९ बंगले चोरीला गेले- किरीट सोमय्या

मुंबईः  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १९ बंगल्यांवरून ठाकरे कुटुंबावर आरोप सुरू ठेवले आहे.  १७ महिन्यांपासून सोमय्या १९ बंगल्यांचा पाठपुरावा करत आहेत. ते आज रागयड जिल्ह्यातील कोर्लाई गावात जाणार आहेत. तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी करणार आहेत. पण कोर्लाईचे सरपमच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

 

किरीट सोमय्यांनी म्हटले की, प्रशासनाने आम्हाला अडवले तर आम्ही काहीही विरोध करणार नाहीत पण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते अडवत असतील तर मात्र काय होईल हे सांगू शकत नाही. १९ बंगले ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहेत. जर हे बंगले त्यांचे असतील तर ते त्यांच्या संपत्तीमध्ये का दाखवण्यात आले नाहीत. मला कोर्लईमध्ये आधीही गेलो होतो त्यावेळीही तिथल्या सरपंचांनी विरोध केला होता. हे खरे आहे की नाही याचे स्पष्टीकरण ठाकरे कुटुंबाने द्यायचे आहे. देव पण चूक करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावे माझ्या पत्नीचे १९ बंगले चोरीला गेले, असे म्हणत कोर्लाईला जाताना सकाळी सोमय्यांनी टीकास्त्र सोडले.

घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे. ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे. जानेवारी २०१९ मध्ये ठाकरे सरकारने पत्र दिले. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावाने घरे करावी असे पत्र दिले. १२ नोव्हेंबर २०२० आर्टिजीएसने खात्यात पैसे ट्रान्सफर झाले सप्टेंबर २०२० पासून मी पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात जी कागदे दिली आहेत त्याचा एकदाही उद्धव ठाकरे यांनी इन्कार केलेला नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

भाजपच्या दबावामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली

Share