मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

मुंबई-  राज्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी  संजय पांडे यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर असणारे हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील.

संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलिसांच प्रमुखपद भूषवल आहे. याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत संजय पांडे ?

भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे १९८६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या कालावधीतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून त्यांनी केलेल्या कारवाईमुळे पांडे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतून उतरले होते. पुढे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, परंतु तो स्वीकारला नाही. त्यांनी राजानीमा परत घेतला, मात्र त्यावेळेपासून पांडे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला होता.

Share