आज पेट्रोलचे दर सामान्यांना परवडणारे आहेत का? जाणून घ्या इंधनाचा लेटेस्ट भाव

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे आज कच्च्या तेलाची किंमत वाढली असून कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२४ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. मात्र तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज मुंबई पेट्रोलचा दर १११.३५ रुपये तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. त्याच वेळी, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.३० रुपये तर डिझेलचा दर ९६.३८ रुपये प्रति लिटर आहे. तर नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.४१ रुपये तर डिझेलचा दर ९५.९२ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share